नाशिकमध्ये भाजपच्या एका निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट नाकारल्याने कार्यकर्त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. माघार घेऊ नये म्हणून त्यांनी या बंडखोर उमेदवाराला घरात कोंडून ठेवले आहे. पक्षाकडून दबाव आणि आमिष दाखवले जात असले तरी, हा उमेदवार लढणारच असा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. त्यांनी उमेदवाराच्या गाडीची चावीही काढून घेतल्याचे सांगितले.