गेल्या आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात थंडीने जोरदार पुनरागमन केले आहे. निफाडमध्ये किमान तापमान ६.१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून कुंदेवाडी आणि रुई येथे लक्षणीय नोंद झाली. यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवल्या आहेत. मात्र, या अचानक वाढलेल्या थंडीचा फटका द्राक्ष बागांना बसण्याची भीती असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत.