गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील वणी आणि चंडिकापूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चंडिकापूर-अंबानेर रस्त्यावरील काळू महाले यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज मध्यरात्रीनंतर हा बिबट्या अडकला.