नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कोटमगाव येथे पपई उत्पादक शेतकरी गोकुळ कोटमे यांच्या पपई बागेला वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका बसला. वादळामुळे पपईच्या झाडांच्या फांद्या तुटल्याने बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.