आज सकाळी ७.३० वाजता २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीत मुंबईसह राज्यातील २८६९ जागांचा समावेश आहे. मात्र, नाशिकमध्ये मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने प्रभाग क्रमांक २४ मधील मॉडर्न हायस्कूलमध्ये मतदानाला उशीर झाला आहे, ज्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीलाच तांत्रिक अडचण निर्माण झाली.