नाशिकच्या ग्रामीण भागात मालेगाव, कळवण, देवळा तालुक्यातील वासोळसह परिसरातील गावात मधमाशांचे प्रमाण घटल्याने परागीकरण प्रक्रिया होण्यास अडचणी येत आहेत.त्यामुळे सध्या शेतात उभे असलेले कांदा बियाणे आणि टरबूज पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी विभागाने कृत्रिम मधमाशी पेट्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे