देवळा तालुक्यातील विठेवाडी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने जेरबंद केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते, आता स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले असून, बिबट्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.