शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या समर्थकांनी काळा रामाला साकडे घातले आहे. त्यांची तब्यते लवकर बरी व्हावी यासाठी काळाराम मंदिरात खास महापुजा करण्यात आली. यावेळी खासदार निलेश लंके यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता दुग्धाभिषेक करण्यात आला.