नाशिक येथील सातपूर परिसरात मंदिरातून मुर्ती चोरीला गेली आहे. आनंद छाया कॉलनीतील लालबागचा राजा गणेश मंदिरातून दानपेटी चोरीला गेली आहे. नूतनीकरण सुरू असल्याने दानपेटीत मोठी रक्कम असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंदिर अध्यक्ष रमेश शेवाळे यांची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. परिसरातील आणखी एका मंदिरातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना, नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.