नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पायरवाडी या आदिवासी पाड्यावर मार्च महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा पहावयास मिळत आहे. महिलाना अर्धा किमीची पायपीट करत वाकी धरणालगत असलेल्या झिऱ्यातून पाणी आणावं लागत आहे. रोज नवीन झिरे उकरून त्यातील गढूळ पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.