नाशिक : येवला शहरातील विंचूर रोड परिसरातील मित्र विहार कॉलनीजवळून जाणाऱ्या चारीतून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. या गळतीमुळे परिसरात पाणी साचून राहिले असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील 17 गावात पाण्याची टंचाई जाणवतअसून टँकरने पाणी पुरवठा सुरु असताना अशा प्रकारे होणारा पाण्याचा अपव्यय नागरिकांमध्ये नाराजी निर्माण करणारा ठरत आहे.