नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्व परिसर जलमय झाला. नाशिकच्या पूर्व भागात कुठेच पाऊस नसताना फक्त जळकू येथे पावसाने धुवांधार बॅटिंग करीत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले.