नाशिकचा पुढील महापौर प्रजासत्ताक दिनानंतर निश्चित केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या पदाबाबतचा निर्णय घेणार आहेत. नाशिक महापालिकेत महापौर पदासाठी नेत्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू असून, मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील महापौर निवड झाल्यानंतरच नाशिकचा नंबर लागेल अशी शक्यता आहे.