राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासनाची फसवणूक केली आहे. खोटे कागदपत्र तयार करून नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील वीसे मळा येथील घर लाटल्याच्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने वर्ग एकचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खोटे कागदपत्र दाखल करून मिळवलेल्या घराबाहेरून आढावा घेतलाय.