नाशिक : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अपेक्षित मान्सून अद्याप सक्रिय झाला नसल्याने कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात जून महिना जवळपास कोरडाच गेला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील शेती संकटात सापडली असून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लागवड केलेली टोमॅटो आणि मिरचीची पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रति एकर सुमारे 70 ते 90 हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र वेळेवर पाऊस न झाल्यास हा सर्व खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.