नाशिकच्या सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा कार कठडा तोडून कोसळल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला. सप्तशृंगी देवीच्या दर्शनाहून परतणाऱ्यांवर काळानं घाला घातला. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेवर दुःख व्यक्त केले. मदतकार्य वेगाने सुरू आहे.