नाशिकच्या सिन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हाहाकार उडवला आहे. पिंपळगाव धनगरवाडीत शेतकऱ्यांचे संसार त्यामुळे उघड्यावर पडले आहेत. तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसामुळे पिंपळगाव धनगरवाडी येथे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळाचा वेग इतका तीव्र होता की अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घरांचे पत्रे अंगावर पडल्याने प्रांजल डुंबरे ही ११ वर्षांची मुलगी जखमी झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.