नाशिकच्या सिन्नर शहरातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. नवीन मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी धडक मोहीम राबवून १५० अतिक्रमणे हटवली. २०० अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या आहेत. ही संयुक्त कारवाई नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने केली असून, शहरवासीयांनी तिचे स्वागत केले आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे झालेल्या वाहतूक कोंडीतून आता दिलासा मिळाला आहे.