अमेरिका व इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वातावरण चिघळले असून भारतातून अनेक पर्यटक व मुस्लिम बांधव हे हाजी यात्रेसाठी मक्कामध्ये गेले आहे. नाशिकच्या येवला शहरातील शेखलिंबूवाले कुटुंबियांमधील 6 लोक मक्का शहरात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी येवल्यातील त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.