सटाणा तालुक्यातील तळवाडे दि. येथे सप्टेंबरमधील पीक नुकसानीवरून शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले. पीक नुकसान भरपाईच्या मूल्यांकनात घोळ झाल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी ग्रामसेवकाला जाब विचारला. ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी पूर्ण पीक बाधित दाखवले असताना, शेतकऱ्यांचे पीक अल्प प्रमाणात बाधित दाखवल्याने हा रोष उफाळला. न्याय मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून निषेध नोंदवला.