सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने त्याचा परिणाम माणसांसह प्राण्यांवरही होताना दिसत आहे. विशेषतः पोल्ट्री व्यवसायावर या वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम होत आहे. कोंबड्या या उष्णतेला फार संवेदनशील असल्याने त्यांच्या आरोग्यावर तसेच उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर येवल्यातील अनेक पोल्ट्री व्यवसायिकांनी आपल्या कोंबड्यांना उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी "फोगरद्वारे" पाण्याचा शिडकावा होऊन कोंबड्यांना थंडावा मिळत आहे.