रामसर दर्जा प्राप्त असलेल्या नांदूरमध्यमेश्वरच्या जलाशयात अडीच एकराच्या बेटावर दोन ते तीन हजार सहस्त्र कमळपुष्पे फुलली आहेत.जलस्तर टिकून राहिल्याने एरव्ही जुलै-ऑगस्टमध्ये बहरणारी कमळ पुष्पे यंदा मे महिन्यातच बहरली आहेत.ऑक्टोबरपर्यंत फुलांचा हंगाम चालणार आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत कमळ फुलांचे प्रमाण यंदा दुपटीने अधिक आहे. जखाना पक्ष्याचे आवडते खाद्य म्हणजे कमळाचे फुल असते.सहस्र कमळपुष्पे निरीक्षणासाठी नांदूर मधमेश्वर वन्यजीव विभागाकडून बोट, गाईड मिळणार आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.