नाशिक शहरात 1,270 झाडे तोडण्यात आली आहेत. नाशिक महापालिकेने चार नव्या मलनिस्सारण केंद्रांसाठी ही वृक्षतोड केल्याचे अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. या वृक्षतोडीवरून आता नवा वाद निर्माण झाला असून तो आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.