मालेगावात उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण होत आहेत. सूर्यनारायण दिवसेंदिवस आग ओकायला लागले आहेत. मालेगाव तालुक्यातील काही विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी विहीरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यातच उन्हाळ्याची काहीली वाढत आहे. पाण्याची पातळी दिवसेदिवस खालावत चाललेली आहे.पाण्यासाठी विहिरींच्या खोलीकरणासाठी सुरुवात झाली आहे. लोक आता पावसाची पहात आहेत.