येवला शहर हे पैठणी साड्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. पारंपरिक डिझाईन्स, रंगसंगती आणि नाजूक विणकामासाठी ओळख असलेल्या या कलेत आता आधुनिक कल्पकतेची भर पडताना दिसत आहे. चेतन धसे या कारागिराने पैठणी साडीच्या पदरावर श्रीकृष्ण व श्री स्वामी समर्थ यांच्या जिवंत भासणाऱ्या प्रतिमा विणून एक अनोखा प्रयोग साकारला आहे.