देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यासाठी तमिळनाडू ते गुजरातमधील केवडिया असा प्रवास करणाऱ्या राष्ट्रीय एकता मोटरसायकल रॅलीचे दौंड येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात येथे आयोजित कार्यक्रमात राज्य राखीव पोलीस बल आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने रॅलीला पुढील प्रवासासाठी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.