लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लातूर ते सोलापूर महामार्ग अडवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.