पुण्यातील नवले पुलाजवळ वाहन चालकांची भर रस्त्यावर तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. वाहन चालकांमध्ये क्षणात शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. भररस्त्यात झालेल्या राड्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.