मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा आजपासून पुन्हा सुरू केली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार पनवेल ते मुंबई दरम्यान १४ वातानुकूलित फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे नवी मुंबईसह हार्बर मार्गावरील प्रवाशांना उष्णतेपासून दिलासा मिळून गारेगार आणि सुखकर प्रवास करता येईल. वेळापत्रक जाहीर झाले असून, पीक अवरमध्येही एसी लोकल धावतील.