राज्य सरकारने नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस हिरवा कंदील दिला आहे. या योजनेतून एकूण 72,665 कुटुंबांना लाभ मिळणार आहे. सन 2000 पूर्वीच्या पुरावे असलेल्यांना मोफत घरे मिळतील, तर 2000 ते 2011 दरम्यानच्या पात्र कुटुंबांना अडीच लाखांत घर उपलब्ध होईल. गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला आहे.