नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांसाठी कार्यान्वित झाले आहे. या शुभारंभाच्या दिवशी एका महिला प्रवाशाने गृहप्रवेशाप्रमाणे अनवाणी पायी येऊन विमानतळाचे अनोखे स्वागत केले. त्यांनी या पहिल्या प्रवासातून सर्व प्रवाशांसाठी सुरक्षिततेची आणि सुखरूप प्रवासाची सदिच्छा व्यक्त केली.