नवी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये लेडीज डब्यातून बाहेर जाण्यास सांगितल्याच्या रागातून एका व्यक्तीने एका तरुणीला लोकलमधून ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानकात एकच गोंधळ उडाला असून, प्रवाशांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. प्रत्यक्षदर्शींनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.