नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 'प्लास्टिकमुक्त नवी मुंबई'चा संदेश देत प्लास्टिकपासून बनवलेले बेंचेस शाळांना प्रदान केले. या सोहळ्यात मनपा अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.