नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची तीव्रता प्रचंड असून, अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जवानांकडून आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील दोन कंपन्यांना खाली करण्याचे आदेश दिले आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.