नवी मुंबईतील रबाळे MIDC परिसरात व्हॉट्सॲप स्टेटसवरून दोन गटांत मोठा राडा झाला. एका वादग्रस्त स्टेटसमुळे सुरू झालेल्या या वादामुळे मारहाण व शिवीगाळ झाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत सहा आरोपींना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यामुळे घटनेची भीषणता स्पष्ट झाली आहे.