नवनाथ बान यांनी संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे, त्यांना जोडे खायच्या लायकीचे ठरवले आहे. न्यायालयाचा निकाल स्वतःच्या बाजूने लागल्यास कौतुक करणे, परंतु विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या जनादेशानंतर निवडणूक आयोगावर टीका करणे हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप बान यांनी केला. जनतेने मतदानातूनच त्यांना गोटे मारल्याचे ते म्हणाले.