चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 'भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष' या वक्तव्याचे माजी खासदार नवनीत राणा यांनी समर्थन केले आहे. विरोधकांचे काम आरोप करणे असले तरी आपले काम जनतेपर्यंत पोहोचले आहे, असे त्या म्हणाल्या. अमरावतीतील सूतगिरणी प्रभागात भाजप आणि युवा स्वाभिमान युतीचा प्रचार करत असल्याचे राणा यांनी सांगितले, कमळासोबत प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.