करमाळा येथील आराध्यदैवत आई कमलाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आई कमलाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.