राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडिया म्हणून टीका केली आहे. त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भिवंडी शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी बुधवारी सकाळी आपल्या समर्थकांसह भिवंडी शहर काँग्रेस कार्यालया मध्ये शिरले. त्या ठिकाणी काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण पाटील व कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आहेत.