अंबरनाथमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक २८ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोन जणांना रंगेहात पकडून भरारी पथकाच्या ताब्यात दिले. अंबरनाथमध्ये ५९ जागांसाठी मतदान होणार असून, अजित पवार गटानेही यापूर्वी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला होता.