राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथील कोथळी येथे आज त्यांच्या परिवाराच्या वतीने विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी एकनाथ खडसे यांचे औक्षण करत लाडू तुला करण्यात आली आणि त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.