राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवार गट 9 सप्टेंबर रोजी आपली भूमिका जाहीर करणार आहे. रोहित पवार पत्रकार परिषदेत सर्व मुद्दे स्पष्ट करतील. तोपर्यंत गटातील नेत्यांना या विषयावर न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रफुल पटेल यांनी सध्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे म्हटले आहे, त्यामुळे रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.