परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. 411 उमेदवार घरोघरी जाऊन मते मागत आहेत, तर विविध पक्ष प्रचार सभा आणि रॅली आयोजित करत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराने राजस्थानमधील प्रसिद्ध 'कच्ची घोडी' नृत्यप्रकार सादर करत एक वेगळा आणि हटके प्रचार सुरू केला आहे, ज्यामुळे निवडणुकीत अधिक रंगत आली आहे.