नाशिक : सटाणा शहरातून जाणाऱ्या सुरत-नाशिक महामार्गावरील वाढलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी महामार्गावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.