पक्ष बदलू आणि गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत,असा गर्भित इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे. नुकतच सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.