राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत काळी दिवाळी साजरी करण्यात आली. अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी मोठे पॅकेजची घोषणा केली पण दिवाळी एक दिवसावर आली असली तरी अद्याप पर्यंत कुठलीच मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे ही दिवाळी काळी दिवाळी असून ही जिल्हा प्रशासनाच्या समोरच आम्ही साजरी करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेटवरच हे आंदोलन केले.