एमआयडीसीच्या केमिकलमिश्रित पाण्यामुळे उल्हासनदीतील मासे मरत आहेत. दोन दिवसांत कारवाई करा, अन्यथा दूषित पाण्याने आंघोळ घालू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कल्याण येथील कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलावरच मृत माशांची टोपली ठेवून निषेध केला आहे.