उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं की, आम्ही जी माहिती घेतली त्यानुसार आमदार जितेंद्र आव्हाड हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर दिसले की सातत्याने घोषणाबाजी करायचे. विधिमंडळाच्या परिसरामध्ये कोणीही वरच्या आवाजात एकमेकांवरती ओरडू नये अशा सूचना आहेत. असं असताना देखील या सूचनांचे पालन झालं नाही. म्हणून हा संघर्ष वाढला.