पुण्यातील विषारी दारू प्रकरणासंदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात गेल्या होत्या. पुण्यातील विषारी दारू प्रकरणात २४ लोक मृत्युमुखी पडले होते. विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. तपासाचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे सीआयडी कार्यालयात गेल्या होत्या.