नाशिक जिल्ह्यात रविवारी 21 परिक्षा केंद्रावर 11, 180 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नीट परीक्षा केंद्र परिसरात सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत जमाव बंदीचे आदेश आहेत. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर अंतरापर्यत जमावबंदी राहणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. परिक्षा कक्षात cctv आणि जॅमर बसवले आहेत. प्रत्येक परीक्षार्थींची तपासणी करूनच परिक्षा कक्षात सोडले जाणार आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात परिक्षा साहित्याची वाहतूक होणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.